मनोज जरांगे पाटलांच्या’ या’नव्या मागणीने भुजबळांसह सरकारला धडकी ; ओबीसीमध्ये खळबळ..

पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला. यावरून आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये तेढ निर्माण झाला असून छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता जरांगे पाटलांनी केलेल्या नव्या मागणीने भुजबळ यांच्यासह सरकारला धडकी भरणार आहे.छगन भुजबळांना आवर घालण्याची किंवा त्यांना तुरुंगात पाठवावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे. छगन भुजबळ यांना नाव आणि प्रसिद्धीची खूप मस्ती आहे. ते सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत. भुजबळ सरकाला पद्धतशीरपणे अडचणीत आणत आहेत. जोपर्यंत भुजबळ आहेत, तोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाज एकत्र येऊ शकत नाही. सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा हा माणूस मोठा नाही. त्याचे पाय धरा, खाली आपटा आणि त्याला तुरुंगात जाऊ द्या,” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान छगन भुजबळ हे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये तेढ निर्माण होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळामुळे डाग लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
