बारामतीत पवार घराण्यात हायव्होलटेज ड्रामा ; ताई आउट, वहिनीं इन, मेडिकल कॉलेजच्या अभ्यागत मंडळातुन सुप्रिया सुळेनां वगळले…


बारामती : राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीमध्ये पवार घराण्यात पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. 2019 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत सुरु झाले होते. या संस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी यापूर्वी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. मात्र आता त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यावरून आता पवार घराण्यातील अंतर्गत धुसफूस आणि राजकारण पुन्हा उफाळून आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली. तीन सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या संबंधीचा शासन निर्णय घेतला.या शासन निर्णयातील तरतुदींनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णायल बारामती या संस्थेच्या अभ्यागत मंडळावर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पाच शासकीय सदस्यांचा मंडळावर समावेश करण्यात आला आहे. या सदस्यांमध्येज्योती नवनाथ बल्लाळ, डॉक्टर कीर्ती सतीश पवार,डॉक्टर सचिन कोकणे,अॅड. श्रीनिवास वायकर,डॉक्टर दिलीप लोंढे,अविनाश गोफणे,,बिरजू मांढरे या 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान आगामी स्थानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुप्रिया सुळे यांची उचलबांगडी करण्यात आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना समितीतून डावलण्यात आल्याने बारामती चर्चेला पुन्हा उद्याण आल आहे.ही समिती पुढील दोन वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. खासदार सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीला राजकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आता प्राप्त झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!