मोठी बातमी! ओबीसी समाजाच्या नाराजीचा धसका ; मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय…


पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने काल शासन निर्णय जारी करत हैदराबाद गॅझेट लागू केले. यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या पाच दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाचा विजय झाला. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर सुवर्णमध्य साधला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला. शासनाच्या या निर्णयानंतर ओबीसी नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी तर आज मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकला. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू करत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला आहे. ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा जीआर आजच जारी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी नेत्यांमधील नाराजी कमी होणार का हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत इतर कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले?

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ,लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार

महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा

कारखाने अधिनियम, १९४८ मध्ये सुधारणा

अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार

मुंबईतील आणिक डेपो- वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- ११ प्रकल्पास मान्यता. २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद

ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – २, मार्गिका – ४ तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसहाय्यित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता.

पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-3) व ३अ (MUTP-3A) प्रकल्पातील लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता
बाह्य सहाय्यित कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास, तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने ५०% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP- 3B) या प्रकल्पातील राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास मान्यता

पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार उचलणार

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग
हा प्रकल्प सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी-भागीदारी अंतर्गत BOT तत्त्वावर राबविण्यात येणार

“नविन नागपूर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणारनागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगांव (रिठी), तालुका हिंगणा जि. नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र ६९२.०६ हे. आर. जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ “नविन नागपूर” अंतर्गत “International Business and Finance Centre (IBFC)” विकसीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास तत्वत मान्यता.

नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती.नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट विकसित करणार.

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यताप्रकल्पासाठी ३ हजार ७५० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!