पुण्यात वातावरण तापलं ; ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक,मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर फाडला..


पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केलं.अखेर त्यांच्या आंदोलनाला यश येत राज्य सरकारने मंगळवारी जीआर काढला.आता या जीआर वरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.पुण्यातील महात्मा फुले वाड्यात लक्ष्मण हाके यांच्यासह इतरही ओबीसी नेत्यांचे आंदोलन सुरू आहे. ओबीसी नेत्यांनी मौन आंदोलन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने शासनाचा निषेध केला. ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते लक्ष्मण हाके यांनी शासनाने पारित केलेला शासन निर्णय अर्थात जीआर फाडला आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून ओबीसी आरक्षणावर घाव घालण्याची अक्षम्य चूक केली. त्यामुळे आम्ही हा जीआर फाडून शासनाचा निषेध करतो आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा शासकीय निर्णय मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. या माध्यमातून बहुतांश मराठा समाजाच्या अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा करून शासनाने मागील दाराने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा डाव खेळल्याचा आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

मराठा समाजाच्या विजयानंतर राज्यभरात आजपासून वेगवेगळ्या महत्त्वांच्या शहरांत आणि तालुक्यातालुक्यात ओबीसी समाज शासनाच्या निर्णयाचा विरोध करेल, असे सांगत ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या पुढील लढ्याची दिशा लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!