मराठ्यांनो कुणबी प्रमाणपत्र कसं काढायच? काय काय लागणार? जाणून घ्या शासनाची महत्वाची माहिती…


मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात काल मोठा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आलं आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे.

या निर्णयानुसार, आता हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी लक्षात घेऊन कुणबी प्रमाणपत्रे दिले जाणार आहे. पात्र व्यक्तींना ही प्रमाणपत्रे दिली जाणार आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटमधील १९२१ आणि १९३१ च्या नोंदींचा आधार घेण्याचे ठरवले आहे.

या नोंदींमध्ये कुणबी जातीचा उल्लेख ‘कापू’ नावाने आहे, जी प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करणारी जात आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखण्यासाठी हा एक सोपा आणि ठोस पुरावा मानला जाणार आहे.

कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक गावात तीन सदस्यांची समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. ही समिती अर्जदारांच्या पात्रतेची तपासणी करेल.

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय-काय लागणार?

ज्या मराठा व्यक्तींकडे शेतजमिनीचा मालकी पुरावा नाही, त्यांना १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी किंवा त्याआधी त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. यानंतर समितीमार्फत त्याची चौकशी केली जाईल.

जर अर्जदाराचा गावातील किंवा कुळातील एखाद्या नातेवाइकाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, तर संबंधित व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. दरम्यान, या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, ऐतिहासिक नोंदींच्या आधारे ही प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!