विवाहाच्या आमिषाने पुण्यातील हॉटेलमध्ये भयंकर कृत्य, नको तीच धमकी देत तरुणीला लुबाडलं…

पुणे : मॅट्रिमोनी वेबसाइटवर झालेल्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवलं आणि तिला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतक्यावरच न थांबता फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून दोन लाख रुपये उकळण्यात आलेच समोर आले आहे.

ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित गंगाधर शेंडगे, (रा. पारगाव, जि. सोलापूर,) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून, पीडित तरुणीने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांची ओळख गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका मॅट्रिमोनी वेबसाइटवर झाली. विवाहाचे आमिष दाखवून शेंडगेने तरुणीला विश्वासात घेतले. त्यानंतर तो पुण्यात आला आणि तरुणीची भेट घेऊन तिला एका हॉटेलमध्ये नेले.
तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाइलमध्ये छायाचित्रे काढली. यानंतर शेंडगेने छायाचित्रे तरुणीचे नातेवाईक व समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडून दोन लाख रुपये उकळले.
दरम्यान, पीडित तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली असता आरोपीने ‘विषारी औषध पिऊन आत्महत्या करीन आणि तुझे व तुझ्या कुटुंबीयांचे नाव चिठ्ठीत लिहीन,’ अशी धमकी दिली.