पुण्यात राजकीय वातावरण तापणार ; महापालिकेच्या प्रभाग रचनेत भाजपाचा हस्तक्षेप, मविआ न्यायालयात जाणार?


पुणे: आगामी होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. आता या प्रभाग रचनेवरून वातावरण चांगलंच तापलं आहे.महापालिकेसाठीच्या प्रभागरचनेत भारतीय जनता पक्षाने हस्तक्षेप केला आहे. सर्वच प्रभागांची तोडफोड केली आहे. यावरून आता मवीआ न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरून वाद पेटला आहे. त्यामध्ये भाजपने हस्तक्षेप केला असून प्रभागरचनेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या विरोधात हरकती नोंदवल्या जात असून, उच्च न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे,’ अशी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांनी दिली आहे.भाजपचेच नेते प्रभागरचना करीत असल्याचा आम्ही पूर्वी केलेला आरोप खरा ठरला आहे. प्रभाग क्रमांक ३, ६, १३मध्ये तसेच महामार्ग ओलांडून प्रभागरचना केली आहे. एका भाजप नेत्याने आपल्या प्रभागात मागासवर्गीय आरक्षण पडू नये, यासाठी निवडणूक आयोगाचे तत्त्व डावलून प्रभागरचनेत मागासवर्गीयांच्या परिसराची तोडफोड केली आहे. विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी निवडून येऊ नयेत, अशी प्रभागरचना भाजपने केली आहे. याविरोधात आम्ही हरकती नोंदवल्या आहेत. मात्र, प्रशासक व्यवस्थेत आम्हाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात आम्ही आठ सप्टेंबर च्या आत न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीसह सत्तेतील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षांने देखील नाराजी व्यक्त केली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!