खाली बस्स, नाहीतर निघ इकडून…; आझाद मैदानात पोहचताच मनोज जरांगे काय म्हणाले?

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मार्चचा आज श्रीगणेशा झाला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांनी कूच केली आहे. आज जरांगे मुंबई दाखल झाले आहे.

आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे आझाद मैदानात पोहचले. आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यावेळी भाषण करताना समोर कोणीतरी उभे होते.
यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. बस्स खाली नाहीतर निघ इकडून, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. ठरवल्याप्रमाणे आझाद मैदानावर आलो, उपोषण सुरु केलंय, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले. आं

दोलनाला आधी परवानगी नव्हती. त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली. सरकारने सहकार्य केलं, आता आपणही सहकार्य करु…कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही. मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.