मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहविभागाचा धक्कादायक अहवाल ; गुन्हे मागे घेणार?


पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वीअंतरवाली सराटीत मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंग्यामध्ये 200 पेक्षा अधिक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता हे गुन्हे मागे घेण्याबाबत गृह विभागाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

मराठा उपसमितीच्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील गुन्हे अत्यंत गंभीर असल्यानं ते मागे घेण्यात अडचणी येत असल्याचे गृह विभागानं यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवालात नमूद केलं आहे. हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपसमिती चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपसमिती आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. चर्चेला तयार आहे, पण ही चर्चा बंदी खोलीत होणार नाही. सर्वांसमोरच चर्चा होईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाने झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!