ना अन्न मिळालं ना पाणी! 5 दिवसापासून बेपत्ता असलेल्या गौतमने सांगितली सिंहगडावर घडलेली स्टोरी…

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावरून पाच दिवसांपूर्वी साताऱ्यातील एक तरुण गायब झाला होता. पाच दिवस पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या हाती काहीही लागत नव्हतं.

अशातच आता तब्बल पाच दिवसानंतर गायब झालेल्या गौतमचा शोध लागला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ चप्पल सापडल्याने तो दरीत पडल्याची भीती व्यक्त केली जात होती.
मात्र, आता हाच गौतम सिंहगडावर सापडला आहे. कुत्र्याला वाचण्याचा प्रयत्न करत असताना गौतम दरीत पडला आणि बेशुद्ध झाला, असं गौतमने सांगितलं. त्यावेळी त्याने पाच दिवस नेमकं काय काय झालं? याचा खुलासा केला आहे.

मी मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला आलो होतो. तिथं मला लघुशंका आली. त्यावेळी मला एक कुत्रं तिथं दिसलं. ते खाली पडलं होतं. त्याला वाचवायला मी गेलो अन् माझा खालचा पाय देखील घसरला. कुत्र्यासकट मी देखील झाली आलो. ते कुत्रं आहे की नाही, मला माहिती नाही पण मी खाली पडलो.
मला मार लागला होता. त्यावेळी मला वर जायला येत नव्हतं. मी एका कोपऱ्यात बसलो आणि जोरदार पाऊस सुरू होता. मी हाका मारल्या पण कुणीच ऐकलं नाही. माझा आवाज वर जात नव्हता, असं गौतमने म्हटलं.
मला गडावरचं टोक दिसत होतं पण मला वरती चढायला येत नव्हतं. बसल्या ठिकाणीच मला झोप लागली. ज्यावेळी जाग आली त्यावेळीही मला समोर काहीही दिसत नव्हतं. आडव्या बाजूने पुढे जायला येत होतं, पण वरती जायला येत नव्हतं, असं गौतमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय.
गेली पाच दिवस मला काहीच खायला मिळालं नाही, पाणीही मिळालं नाही. जसं जसं पुढे जायला मिळत होतं तसं मी पुढं जात होतो. पाच दिवसांनी मला समोर लांब काही माणसं दिसली, पण माझा आवाज त्यांना जात नव्हता. मला कोणतीच आशा शिल्लक राहिली नाही. मित्रांना मला शोधण्याचा प्रयत्न केला पण मला आवाजच आला नाही, असं म्हणत गौतमने आपबिती सांगितली.