पडळकरांचे रोहित पवारांना ओपन चॅलेंज! म्हणाले, मला मारायचं तर मी बारामतीत येतो, त्यांनी तारीख, वेळ सांगावी…


सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या सोलापुरातील एका कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. शरणू हांडे असे कार्यकर्त्याचे नाव आहे.

शरणू हांडे यांचे अपहरण करणारा मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांना ओपन चॅलेंज देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पडळकर म्हणाले, रोहित पवारांना मला मारायच असेल तर सांगा, मी बारामतीत कधी येऊ. त्यांनी तारीख सांगावी, वेळ सांगावी आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. महादेव देवकाते नावाचा एक व्यक्ती आहे. त्याच्या छातीवरही शरद पवारांचा टॅटू आहे. त्याने माझी भेट घेतली. महादेव देवकाते म्हणतोय की गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती.

त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. महादेव देवकाते याचा जबाब नोंदवून जर त्यांची बैठक झाली असेल तर रोहित पवारांना याप्रकरणी आरोपी करायला हवं. या प्रकरणी ३०७चं कलम लावलं पाहिजे. या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करता येते का, याचा विचार पोलिसांनी करावा.

तसेच पडळकर म्हणाले, रोहित पवारांना मी आवाहन करतो की तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांमध्ये कशाला भांडण लावता. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही समोर या. तुम्हाला मला मारायचं असेल तर मला सांगा मी बारामतीत कधी येऊ. त्यांनी तारीख सांगावी, वेळ सांगावी आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!