एसबीआय बँकेची फसवणूक ; बनावट सोनं तारण ठेऊन तब्बल 7 लाखाचं घेतलं कर्ज, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


सांगली : जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत बनावट सोने तारण ठेवून तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज काढून बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 मे 2015 ते 16 मे 2025 या दहा वर्षांच्या कालावधीत राजेंद्र यादव यांनी एसबीआयच्या पलूस शाखेतून सोने तारण कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान, तारण ठेवण्यात आलेले सोने खरे आहे की नाही, याची खातरजमा स्थानिक सराफांनी केली होती. या सराफांनी संबंधित सोने खरे असल्याचे बँकेला भासवून चुकीची माहिती दिली. काही दिवसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना या सोन्याबाबत संशय आला. त्यांनी तातडीने सोन्याची कसून तपासणी केली. या तपासणीअंती संबंधित सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणामुळे बँकेची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

दरम्यान बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र विठ्ठलराव यादव, राजेंद्रकुमार संतराव शिंदे आणि सुधाकर शिवाजी सूर्यवंशी या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.गोरख मच्छिंद्र पाखरे यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!