सह्याद्रीवर खलबत ; धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, मंत्रिमंडळात एन्ट्री होणार?


पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीतील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काही मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी आग्रही असताना आता राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे.

कृषी साहित्य खरेदी प्रकरणात धनंजय मुंडे यांना क्लीन चीट मिळाल्यानं त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.ते दुपारच्या सुमारास सह्याद्रीवर पोहोचले. त्यानंतर पुढील काही मिनिटांत ते तिथून निघाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरदेखील सह्याद्रीवर पोहोचल्या. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसापासून आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही असल्याचे समोर आल आहे. कोकाटे यांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच त्यांनी सह्याद्रीवर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!