धक्कादायक! पुण्यात माजी उपनगराध्यक्षकाची 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण, आरोपीस अटक


पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात मारहाण, हाणामारी, खून आणि अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच आता तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षकांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्या १४ वर्षीय मुलाला पार्टीत येऊ नको, असे म्हटल्याच्या कारणावरून संतापलेल्या भेगडे यांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किशोर छबूदास भेगडे (वय ५१) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुलाची आई श्वेता शिशिर शालिनी (वय ४५, रा. बाणेर रोड, पुणे) यांनी शिरगाव-परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी उपनगराध्यक्षकाच्या या कारनाम्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!