ऐश्वर्या, कतरिना सगळ्या नंतर, कधीकाळी ‘ही’ अभिनेत्री होती भाईजानच्या दिलाची धडकन, सायकलवरून करायचा पाठलाग..


मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या प्रेमप्रकरणांबाबत नेहमीच चर्चेत असतो. तसेच त्याच्यासोबत ऐश्वर्या रायपासून कतरिना कैफपर्यंत अनेक सुंदर अभिनेत्रींचं नाव जोडलं गेलं. मात्र, सलमान खानने जिच्यावर सर्वात आधी मनापासून प्रेम केलं, तिचं नाव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

ही अभिनेत्री ना ऐश्वर्या, ना संगीता बिजलानी, ना कतरिना… तर ती होती बॉलिवूडची ‘एव्हरग्रीन दिवा’ रेखा. सोशल मीडियावर सध्या २०१४ मधील एक व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. बिग बॉस सीझन ८ मध्ये रेखा अतिथी म्हणून आली होती आणि त्यावेळी दोघांमध्ये झालेला संवाद आजही लोकांच्या स्मरणात आहे.

त्या शोमध्ये रेखानेच उघड केलं की, सलमान खान वयाच्या अवघ्या ६-७ वर्षांचा असताना तिला फॉलो करायचा, फ्लर्ट करायचा आणि चक्क तिच्यावर प्रेम करायचा!रेखाने सांगितले की, “मी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जायचे आणि सलमान सायकलवरून माझा पाठलाग करायचा.

त्याला तेव्हा कळलं नव्हतं की तो माझ्या प्रेमात आहे, पण तो म्हणायचा की, ‘मी मोठा झाल्यावर या मुलीशी लग्न करेन!’” या किस्स्यावर स्टेजवरच सलमान लाजून गालात हसत होता.

रेखाने दिलेली ही माहिती ऐकून उपस्थित प्रेक्षक आणि सलमानचे चाहते एकदम चकित झाले होते. सलमानचं हे बालपणीचं निरागस प्रेम म्हणजे एक मजेदार आठवण आहे. त्याच्या प्रेमप्रकरणांमध्ये जरी अनेक नावं आली असली, तरी त्याच्या पहिल्या ‘क्रश’चं नाव रेखा असल्याचं खुद्द त्यानेही अप्रत्यक्षपणे कबूल केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!