पुणे रेव्ह पार्टी प्रकरण ; ‘पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? ती महिला कोण आहे? ; खडसेंच्या जावयाच्या वकिलांच्या शंका

पुणे : पुण्यातील गाजलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणावरून राजकारण चांगलंच रंगत चाललं आहे. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली. या अटकेत असलेल्या सातही आरोपींची पोलिस कोठडी आज संपली असून त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले. सध्या कोर्टामध्ये आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तीवाद सुरू आहे. यादरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी अनेक शंका उपस्थित केल्या. ‘पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? ती महिला कोण आहे?, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जावई खेवलकर यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पोलिसांनी ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली, त्याचे चित्रण हे जगासमोर आले आहे. पोलिसांना कोणती अधिकार आहे पर्सनल लाईफ दाखवण्याचा, पोलिसांनी हे बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी करणं आणि खडसेंच्या जावयाच नाव घेण म्हणजे हे सर्व एकनाथ खडसे यांच्या फॅमिलीला बदनाम करण्याच कृत्य असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. यानंतर आज कोर्टात ही प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे यांनी कोर्टात अनेक शंकर उपस्थित केल्या आहेत. कोर्टात बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या आरोपीवर ट्रॅप लावला आणि त्यांना ताब्यात घेतलं गेलं. मागील वेळेचा अगदी बरोबर तोच रिमांड रिपोर्ट दिला आहे. रिमांड रिपोर्टमध्ये काय जप्त करायचं आहे याचा उल्लेख नाही. अमली पदार्थ कोणाच्या बॅगमधून आले? ईशा सिंग यांच्या बॅगमधून आले. ज्या महिलेच्या बॅगमधून अमली पदार्थ आले त्यांना तुम्ही न्यायालयीन कोठडी मागता. पहिल्या रिमांडमध्ये आम्ही सहकार्य केलं.’आम्हाला अडकवण्यासाठीच त्या महिलेला आणण्यात आले होते असे ते म्हणाले.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आम्हाला अडकविण्यासाठी त्या महिलेला तिथे आणलं गेलं का? २.७० ग्रॅम कोकेन आढळून आल्याचं सांगितलं गेलं. पण त्यातल्या पिशवीचे वजन २ ग्राम आहे म्हणजे किती मिलीग्रॅमचा हा साठा होता. प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळावी.’, अशी मागणी विजय ठोंबरे यांनी केली आहे.
