कारमध्ये बसवलं, हात मागे बांधून विवस्त्रं केलं अन् पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार, घटनेने लोणावळा हादरलं..


पुणे : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला तात्काळ अटक केली असून दोन जणांचा शोध घेतला जात आहे. लोणावळ्यातील या घटनेनंतर पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

तरूणीवर २५ ते ३० वयोगटातील तीन अज्ञात व्यक्तींनी कारमध्ये जबरदस्तीने ओढलं. तिघांनी तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी ही लोणावळा परिसरातील आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, तरूणी तुंगार्ली गावातील एका रस्त्याने जात होती, त्यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तोंड दाबून गाडीमध्ये जबरदस्तीने डांबले. तरूणांनी तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर हात बांधून, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

नांगरगाव येथील दत्त मंदिर दत्त सोसायटी शेजारील एका निर्जन रस्त्यावर एक तरुणी संशयास्पद रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. याबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिकांनी या तरुणीला शेजारी असलेल्या एका मंदिरात ठेवले होते. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरूणीवर प्रथम वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी तरूणीचा जबाब नोंदवला.

त्यानंतर या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. लोणावळा शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!