आता रेल्वे सेवेत मोठी क्रांती होणार!! हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची ट्रायल यशस्वी करत रेल्वेने रचला नवीन इतिहास…


चेन्नई : भारतीय रेल्वेने एक इतिहास रचला आहे. चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत देशातील हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या ट्रेनची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. यामुळे भारतीय रेल्वेचे हे एक मोठं यश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या यशस्वी चाचणीमुळे हायड्रोजनवर रेल्वे धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या कोच (ड्रायव्हिंग पॉवर कार) च्या आयसीएफची चेन्नईत यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. भारत 1200 एचपी हायड्रोजन ट्रेन विकसित करत आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

यामुळे येणाऱ्या काळात हा एक नवीन पर्याय भारतीय रेल्वे समोर असणार आहे. हरित ऊर्जा आणि भविष्यातील परिवहन सेवेसाठीचे नवे पर्याय निर्माण करण्यासाठी भारत नेहमीच वचनबद्ध राहिला आहे, असे वैष्णव यांनी सांगितले आहे. ही ट्रेन पर्यावरण पूरक आहे.

यामध्ये धूर निघत नाही, कार्बन डायऑक्साईडही सोडला जात नाही. त्यामुळे प्रदूषण होत नाही. ही ट्रेन हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानावर काम करते. यात हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून एनर्जी निर्माण होते. यामुळे ही फायदेशीर ठरते.

दरम्यान, 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची आम्ही योजना आखत आहोत. प्रत्येक ट्रेनसाठी अंदाजे 80 कोटी रुपये खर्च होणार आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली होती. यामुळे येणाऱ्या काळात या ट्रेन लवकरच आपल्याला रेल्वे स्टेशनवर दिसणार आहेत. आता याचा फायदा किती होणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!