शिंदवणे येथे किरकोळ वादातून मोठा राडा! तरुणावर थेट चाकूने हल्ला, नेमकं प्रकरण काय?


उरुळी कांचन : याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने वार केल्याची घटना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.

आज पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाट परिसरातील हॉटेल अंबिका येथे ही घटना घडली आहे. याबाबत जखमी हरिसिंग धार्मिक असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. हरिसिंग धार्मिक व त्याचे दोन मित्र हे रेल्वेत काम करतात. संध्याकाळी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाले.

हा वाद वाढतच गेला. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले व दोघांनी मिळून हरिसिंग याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार केले. त्याच्यावर उरुळी कांचन येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले. कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून जखमी झालेल्या हरिसिंग धार्मिक याला सिद्धिविनायक रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत उरुळी कांचन पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!