विकृतीचा कळस! येरवड्यात कचरा वेचणाऱ्या महिलांना गुंडांकडून बेदम मारहाण, विनयभंगाचाही आरोप


पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात खून,हाणामारी, अत्याचार अशा गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढताना दिसत असतानाच आता पुण्यातील येरवडा भागात धक्कादायक घटना घडली आहे. कसारा दिसून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलांना काही स्थानिक गुंडानीं बेदम मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गुंडांनी विनयभंग केल्याचादेखील आरोप महिलांनी केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२५ रोजी, येरवड्याच्या एका वस्तीत काही महिलांवर स्थानिक गुंडांनी हल्ला चढवला. नितीन अडसूळ, ओमकार अडसूळ, पप्पू अडसूळ आणि भाऊ या चौघांनी मिळून पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.पीडित महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात विनयभंग, शारीरिक मारहाण आणि धमक्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. अद्याप पोलीसांनी आरोपींवर कठोर कारवाई केली आहे का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पीडित महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे की, गुंडांनी आम्हाला रस्त्यावर अडवून आमचे कपडे ओढले, शिवीगाळ केली तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शारीरिक नव्हे तर मानसिक छळ झाल्याचे ही पीडित महिलेने तक्रारीत नमूद केल आहे.दरम्यान याप्रकरणी स्थानिक नागरिकांनीही पोलिसांकडे त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!