केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर…


पुणे : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाच्या सर्वांगीण पायाभूत विकासासाठी संकल्पपूर्वक आणि झपाट्याने काम करणाऱ्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचा मोठा सन्मान होत आहे.

त्यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर झाला आहे, ही एक गौरवाची बाब आहे. देशाच्या रस्ते व पायाभूत विकासामध्ये त्यांनी केलेले कार्य दूरदृष्टीपूर्ण, परिणामकारक आणि प्रेरणादायी आहे. नितीन गडकरी यांनी राज्यासह देशाच्या अनेक पदांवर काम केले आहे.

तसेच नितीन गडकरी यांचे कर्तृत्व नेहमीच ‘विकसित भारत’ या संकल्पनेला भक्कम आधार देते. या निवडीसाठी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे आभार आणि मा. नितीनजी गडकरी यांचे मन:पूर्वक अभिनंदन! असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते विकासात मोठे योगदान दिले आहे. यामुळे अनेक बदल झाले आहेत.

गडकरी यांनी राज्यात आता केंद्रात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत नेहेमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. तसेच अनेक विषयांवर परखड मत मांडून त्यांनी एक दूरदृष्टी दिली आहे. यामुळे त्यांनी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामुळे ही एक गौरवाची बाब आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!