सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आजवरचा रेकॉर्ड मोडला, किंमत पाहून डोळे होतील पांढरे..


नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आता सोन्याच्या दराने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.

सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर, गुंतवणूकदारांची आणखी चांगल्या परताव्याची अपेक्षा वाढली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम आता भारतीय बाजारपेठेवरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

विशेषतः सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड उसळी पाहायला मिळत असून, आज जळगावसह देशभरात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक शिखर गाठले आहे. प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता प्रतिदहा ग्रॅम 1,00,000 रुपये इतका झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,03,000 रुपये नोंदविण्यात आला आहे.

फक्त सोनेच नाही, तर चांदीच्या किमतींमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात चांदीचा दर प्रतिकिलो 1,18,000 रुपये इतका नोंदवला गेला असून, हा दर आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. या वाढीमागे केवळ जागतिक संघर्षच नाही, तर भारत सरकारने अलीकडेच लागू केलेल्या आयात टॅरिफमधील बदलांचाही मोठा परिणाम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!