अधिकारी फ्लॅटवर महिलांना घेऊन येतात दारू पाजतात अन्..! हनीट्रॅपमध्ये राज्याला हादरवणारी माहिती झाली उघड


नाशिक : नाशिकमधील एका महिलेने थेट दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे गंभीर आरोप करत मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे काही वरिष्ठ पोलिस अधिकारी व माजी मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात आता मोठा द्विस्ट समोर आला आहे.

याबाबत माहिती अशा की संबंधित महिला नाशिकची असून सध्या ठाण्यात राहते. काही दिवसांपूर्वी हनीट्रॅप प्रकरणात तिचे नाव समोर आले होते. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तिच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आता तिने तिच्यावर अन्याय झाल्याचा दावा करत पोलिस अधिकाऱ्यांविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत.

याबाबत पत्रकार परिषदेत महिला म्हणाली, ठाण्यातील एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने माझ्यासोबत ओळख काढली. माझा नंबर घेतला, गप्पा मारायला लागला. नंतर चहासाठी पोलिस स्टेशनला बोलावलं. एकदा त्यांनी घरी बोलावलं, बायको घरी आहे असेही सांगितले. पण जेव्हा घरी गेले तेव्हा बायको नव्हती, तर दुसराच एक एसीपी दर्जाचा अधिकारी होता.

त्यांनी तिथे मला नकळत पाण्यात गुंगीचं औषध देऊन दोघांनी माझ्यावर बलात्कार केला. मला शुद्ध नव्हती म्हणून काही समजले नाही, पण खूपवेळ हा प्रकार सुरु होता. या घटनेनंतर महिलेने कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, तिला शांत बसण्याचा सल्ला देण्यात आला. पीआय दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांनीही मला गप्प बसायला सांगितलं.

उलट माझ्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला गेला. म्हणे एसीपीवर इंटरनॅशनल कॉल माझ्या माध्यमातून आला, म्हणून गुन्हा दाखल केला, असा गंभीर आरोप तिने केला. यामुळे आता खळबळ उडाली असून हे अधिकरी कोण आहेत, याचा तपास करणे गरजेचे आहे. तिने मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. पण तिला वेळ देण्यात आली नाही. या पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनीही उपस्थिती लावत या महिलेची बाजू मांडली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!