लोणी काळभोर येथे २१ लाखांच्या कामांचे भूमीपूजन


लोणी काळभोर : शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास सुरू आहे. आमदार कटके यांनी त्यांच्या आमदार फंडातून २१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासमवेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच राहुल काळभोर यांनी केले आहे.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील दोन रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना काळभोर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राहुल काळभोर म्हणाले, माळी मळा ते धुमाळमळा रस्ता व फुले नगर मारुती मंदिर ते प्रदीप गायकवाड यांचे घर यादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झालेली होती. वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. परंतु सत्ता नसल्यामुळे विकास कामे करता येत नव्हती. सरपंचपदाची धुरा सांभाळल्यानंतर वरील कामांना प्राधान्य देऊन आमदार फंडातून निधी उपलब्ध करून आणला. तात्काळ या ठिकाणी भूमिपूजन करून रस्त्याचे काम सुरु करणार आहे.

शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास करणार आहे. नागरिकांनी निसंकोचपणे अडचणी सांगाव्यात. सोडविण्यासाठी मी कार्यतप्तर आहे. लोणी काळभोर गावाचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

अशी ग्वाही सरपंच राहुल काळभोर यांनी दिली. यावेळी लोणी काळभोर सोसायटीचे चेअरमन गुरुदेव काळभोर, व्हॉइस चेअरमन सचिन काळभोर, बापूसाहेब बोरकर, बाळासाहेब काळभोर, अशोक गायकवाड, संतोष गायकवाड, आप्पासाहेब काळभोर, कमलेश काळभोर, युवराज काळभोर, सागर काळभोर, माऊली काळभोर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!