जंगली रमी पे आओ ना महाराज! रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अन् आपले कृषीमंत्री रमी खेळण्यात मग्न, रोहित पवारांनी कोकाटेंच सगळंच बाहेर काढलं….


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अनेकदा अडचणीत येत आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत.

तसेच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून परिस्थिती बिकट आहे. आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे वातावरण तापले आहे. सध्या यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

रोहित पवार म्हणाले, सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. असे रोहित पवार म्हणाले.

रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा- कर्जमाफी- भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर अजून कोकाटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

आता यावर माणिकराव कोकाटे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी वक्तव्य करून कोकाटे करत आहेत. यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!