हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपात? लोकसभेची मोट बांधण्यासाठी भाजपकडून आग्रह? माने गटाचे टेन्शन वाढलं, इंदापुरात राजकीय घडामोडी…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात भाजपने आपले राजकीय डाव टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे संजय जगताप इंदापूरचे प्रवीण माने यांचे भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत.असे असताना अजून एका नावाची चर्चा सुरू झाली आहे.

हे नाव म्हणजे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आहे. यामुळे ते देखील लवकरच भाजपमध्ये जातील असे सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांना टक्कर देयची असेल तर सगळ्यांची मोट बांधणे आवश्यक आहे. हर्षवर्धन पाटील यांचे जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत.

त्यांच्यामागे एक लाखाचे मतदान फिक्स आहे. तसेच सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांना राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळाली होती. त्यांची ही नियुक्ती भाजपने केली होती. आता पुन्हा एकदा भाजपने याबाबत रचना केल्याचे सांगितले जात असून हर्षवर्धन पाटील भाजपात आले तर याचा मोठा फायदा भाजपला होणार आहे.

तालुक्यात प्रवीण माने यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे दोघांची मोट बांधून अजित पवार यांच्यावर देखील दबावाने राजकारण करता येणार आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपला हवे आहेत. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल. भाजपमध्ये सध्या माने यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. अशातच पाटील यांचे पुनरागमन झाले, तर दोघांचे गट एकत्र आणत राजकीयदृष्ट्या भाजप डाव टाकू शकतो.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासुन इंदापूरमध्ये भाजपच्या राजकारणाची भिस्त ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर आहे. आता भाजप एका दगडात दोन पक्षी मारेल, असेही म्हटले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!