दररोज रात्री आईला द्यायची झोपेच्या गोळ्या, नंतर रात्रभर प्रियकराशी…!! अल्पवयीन मुलीच्या भयंकर कृत्याने सगळेच हादरले

कृष्णानगर : केवळ 15 वर्षांच्या एका मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्याची घटना कृष्णानगर लखनऊ येथे घडली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आई गाढ झोपली की, स्वतःच्या प्रियकराशी बोलण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी मुलगी रात्री घरातून बाहेर पडायची. नंतर ही घटना उघडकीस आली.

नंतर आईची तब्येत सतत बिघडत गेली आणि वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या औषधाचं प्रमाण अधिक असल्याचं उघड झालं. चौकशीत मुलगी दररोज आईच्या जेवणात तीन ते चार झोपेच्या गोळ्या मिसळायची, हे समोर आले आहे. तसेच मुलीकडे एक विषाची बाटली सापडली होती, जी तिला तिच्या प्रियकराने दिली होती.
मुलीने सांगितले की, तिने आपल्या आईला ठार मारण्याचा कट रचला होता. पण, अखेर तो प्लॅन रद्द करत केवळ झोपेच्या गोळ्यांपुरतीच मर्यादित राहिली. मुलीच्या या धोकादायक वर्तनामागे तिचा प्रियकराशी असलेला भावनिक गुंता आणि आईशी नसलेला संवाद हे मुख्य कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या त्या मुलीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले आहे.

लखनऊमध्ये घडलेली धक्कादायक घटना एक उदाहरण आहे. एका 15 वर्षांच्या मुलीने आपल्या आईला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्या प्रियकराशी संपर्क साधण्यासाठी रात्री घराबाहेर जाण्याचा मार्ग निवडला. तिच्या या कृतीमागे तिच्या प्रियकराने दिलेला चुकीचा सल्ला आणि मुलीचं त्याच्यावरील भावनिक आकर्षण आहे.
सध्या तरुण मुलं आणि पालकांमधील नातं अधिकाधिक ताणलेलं आणि दूर गेलेलं दिसत आहे. किशोरवय हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. या वयात मुलांना स्वातंत्र्याची गरज असते. पण, त्याच वेळी ते भावनिकदृष्ट्या असुरक्षित आणि सहज प्रभावित होणारे असतात. अशा वयात ते चुकीच्या संगतीकडे वळू शकतात.