काय सांगता! 16 वर्षांच्या भाच्यावर मामीची वेगळीच नजर, जीव जडला, म्हणाली, हाच माझा पती…


उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तिथे एका 35 वर्षांच्या महिलेचा तिच्या 16 वर्षांच्या भाच्यावर जीव जडला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिचे त्याच्याशी अनैतिक संबंध असून आता तोच माझा पती आहे, असे ती महिला म्हणत आहे.

त्या अल्वपयीन मुलाच्या घरच्यांनी विरोध केला. पण ते पाहून ती महिला पोलिसांना घेऊ थेट त्याच्या घरीच गेली. आधी तो माझा भाचा होता, पण आता माझा पती आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. सध्या पोलीस अल्पवयीन मुलाच्या वयाच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ही महिला दिल्लीची रहिवासी आहे. तर अल्पवयीन मुलगा तिच्या पतीचा भाचा आहे आणि तो मेरठमधील दौराळा येथील रहिवासी आहे. त्या महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या मुलाला, मामीला मदत करण्यासाठी तिच्याकडे पाठवण्यात आले. दिल्लीत एकत्र असताना महिलेने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्याशी बराच काळ अनैतिक संबंध ठेवले.

आता काही दिवसांपूर्वीच, तो मुलगा त्याच्या घरी आला तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला इथेच थांबवून ठेवलं. मात्र दिल्लीत राहणाऱ्या त्या महिलेला ही बातमी समजताच तिने मेरठ गाठलं आणि त्या अल्पवयीन मुलाला माझ्याकडे देण्याची मागणी तिने केली.

दरम्यान, मुलाचे वय 16 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी, आता त्याच्या वयाचं प्रमाणपत्र मागितले आहे. मोठ्या मुश्किलीने पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून शांत केले. मात्र, अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. यामुळे याबाबत पोलीस प्रयत्न करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!