महाराष्ट्रातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली, यादीच आली समोर..

मुंबई : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. फडणवी सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पुन्हा २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
गृह खात्याने गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार १३ जिल्ह्यातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. मात्र, मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांना वगळता पोलीस दलात फारसा बदल केलेला नव्हता.
याचे कारण पूर्वीच्या सरकारमध्येही फडणवीस हेच गृहमंत्री होते व आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही गृहमंत्रीपद त्यांच्याचकडे आहे. दरवर्षी
सुट्टीच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येतात. त्यानुसार, पोलीस दलात खांदेपालट सुरु आहे.

दरम्यान, यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तसेच उपायुक्त आणि समादेशक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही नवीन पदस्थापना करण्यात आली आहे.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
१) अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२) रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३) राज्य राखीव पोलीस बल, पुणे येथील समादेशक आंचल दलाल यांची रायगड पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
४) कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
५) नांदेड नागरी सुरक्षाचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
६) अकोलाचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 4 नागपूरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
७) नागपूर शहर पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची अकोला पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
८) मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे मंगेश शिंदे यांची नागपूरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
९) मुंबईचे सहायक पोलीस महासंचालक राजातिलक रोशन यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१०) पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
११) गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक यतिन देशमुख यांची पालघर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१२) सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
१३) ठाण्याचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१४) बुलढाणाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची राज्य राखील पोलीस दल अमरावती येथे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१५) नागपूर गुन्हे अन्वेषणचे निलेश तांबे यांची बुलढाणा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१६) साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१७) पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आगे.
१८) लातूर पोलीस अधीक्षक सोमया मुंडे यांची संभाजीनगर परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१९) पुणे दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक जयंत मीणा यांची लातूर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२०) संभाजीनगरचे उपायुक्त नितीन बगाटे यांची रत्नागिरी पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२१) सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.