तिने खून केला आहे का? पूजा खेडकर प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिला महत्वाचा आदेश..


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. हे प्रकरण देशात गाजले होते. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षण मिळविण्यासाठी फसवणूक केल्याचा पूजा खेडकर हिच्यावर आरोप आहे.

यामुळे याबाबत सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर हिला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खेडकर हिला तूर्त मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, पूजाने कोणता मोठा गुन्हा केला आहे? ती ड्रग माफिया किंवा दहशतवादी नाही.

तिच्यावर खुनाचा आरोप नाही. तिने तर सारेच गमावले आहे, तिला कुठे नोकरीही मिळणार नाही, असेही न्यायमूर्ती नागरत्ना यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध केला. ती तपासात सहकार्य करत नाहीत आणि तिच्यावर निश्चित केलेले आरोप गंभीर आहेत, हा दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद खंडपीठाने अमान्य केला.

तिच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांचे स्वरूप आणि प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता, हा असा खटला आहे, जिथे उच्च न्यायालयाने अपीलकर्त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करायला हवा होता. असेही न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, ती पुढील तपासात पूर्ण सहकार्य करेल आणि तिच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करणार नाही. रेकॉर्डवरील सामग्रीशी छेडछाड करणार नाही. वरील अटींचे उल्लंघन झाले तर अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी करण्याचे पोलिसांना स्वातंत्र्य आहे, असेही म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!