लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!! आता 2100 नाही तर मे महिन्याच्या हप्त्यासोबत 3 हजार मिळणार, जाणून घ्या…

मुंबई : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही एक महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या दहा महिन्यांचा लाभ वितरित करण्यात आला असून मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती समोर आली आहे.

आता यामध्ये मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा लाभ मिळेल, असेही सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 रुपये दिले जातील, अशी घोषणा केली होती. मात्र तसे झाले नाही.
यामुळे बहिणी नाराज आहेत. महायुतीचे सरकार स्थापन होऊन आता बरेच दिवस झाले आहेत तरीही 2100 रुपयांबाबत निर्णय होत नसल्याने सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे.

असे असताना राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळणार आहेत. यामध्ये एप्रिल 2025 चा हप्ता 2 मे रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
यामुळे आता पात्र महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यामध्ये काही पात्र महिलांना मे 2025 च्या हफ्त्यासोबत 3 हजार रुपये मिळू शकतात, असेही सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत माहिती आली नसती तरी याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मे महिन्याच्या हप्ता देखील लवकरच जमा होईल, असेही सांगितले जात आहे.