मुंबई अलर्ट मोडवर! किनारपट्टीवर मोठ्या हालचाली ड्रोनच्या माध्यमातून सतर्कता, सुरक्षा वाढवली…

मुंबई : सध्या भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. शहरात संशयित ड्रोन दिसून आल्याचे सांगितले जात आहे. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे.

तसेच संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे. भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे. पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यात आला. सगळ्या प्रकारची काळजी घेतली जात आहे.
देशभरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत तसेच गस्तीत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर तीव्र हल्ला केला. इस्लामाबाद ते कराची, लाहोरपर्यंत भारताने हल्ला केल्याने पाकची अवस्था पळता भुई थोडी अशी झाली आहे. पाकच्या कुरापती कायम असून पाकिस्तानविरुद्धचे युद्ध सुरू झाल्याने भारतानेही देशभरात अलर्ट जारी केला आहे. यामुळे आता वातावरण कधी शांत होणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी ‘सागरी कवच’ ही तटरक्षक मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे.