महिला दिनी पंतप्रधान मोदींनी उचललं मोठं पाऊल! महिला शक्तीच्या हाती दिले सहाही सोशल अकाऊंट…


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट ‘एक्स’ आणि इंस्टाग्राम वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या महिलांना एका दिवसासाठी सोपवले आहेत. त्यांनी त्यांच्या सहाही सोशल मीडिया अकाउंट्स महिलांच्या हाती सोपवले आहेत.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल बोलण्याची संधी मिळाली आहे. देशातील हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. या निर्णयाची सगळीकडे चर्चा सध्या सुरु आहे.

आज महिला दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी ‘X’ वर पोस्ट केले आणि लिहिले की, महिला दिनानिमित्त आम्ही महिला शक्तीला सलाम करतो. आमच्या सरकारने नेहमीच महिलांना सक्षम बनवण्यासाठी काम केले आहे, जे आमच्या योजना आणि कार्यक्रमांमध्ये दिसून येते. आज, वचन दिल्याप्रमाणे, माझ्या सोशल मीडिया प्रॉपर्टीज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून हाताळल्या जातील!

व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व ज्ञान हे देवीच्या विविध रूपांचे अभिव्यक्ती आहे आणि जगातील सर्व महिला शक्ती देखील तिचे प्रतिबिंब आहे. आपल्या संस्कृतीत, मुलींचा आदर करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. या शतकात, जागतिक विकासात महिलांचा सहभाग हा एक मोठा घटक असणार आहे. जो देश, समाज महिलांना अधिक सहभाग देईल, तो जलद गतीने विकास करेल. आज भारतात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा युग आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “महिला या धोरण, सचोटी, निर्णय घेण्याची शक्ती आणि नेतृत्वाचे प्रतिबिंब आहेत. आज भारत महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन योजना आखत आहे आणि निर्णय घेत आहे.

देशाची नवीन शक्ती ही विकसित भारताच्या संकल्पाच्या साध्यतेसाठी सर्वात मोठी हमी आहे. म्हणून यावेळी महिला दिनी, आपण सर्वजण मिळून अदम्य महिला शक्तीचा उत्सव साजरा करूया, तिचा आदर करूया आणि तिला सलाम करूया.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!