प्रेयसीसाठी धर्मांतर केलं, तरी घरच्यांनी मुलीचं लग्न दुसरीकडेच लावलं, संतापलेल्या प्रियकराचे भयंकर कृत्याने दोघांचाही गेला जीव…


बांदा : प्रेमात कोणीही कोणत्या थराला जाईल, सांगता येत नाही. आता उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याठिकाणी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली. यानंतर, मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला पकडून मारहाण केली.

गेल्या तीन वर्षांपासून तरुण-तरुणी रिलेशनशिपमध्ये होते. पण मुलीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसरीकडेच लावले. यामुळे रागातून ही घटना घडली आहे. ही तरुणी तिच्या खोलीत झोपली असताना राहुल उर्फ मुर्शीद छतावरुन तीच्या खोलीत पोहोचला. यावेळी दोघांच्यात बोलणं झालं. यानंतर वाद झाला.

मुलाचे नाव राहुल वाल्मिकी होते. ज्याने आपल्या प्रेयसीसाठी धर्म बदलला होता. धर्म बदलल्यानंतर राहुलने स्वतःचे नाव ‘मुर्शीद’ असे ठेवले होते, पण असे असूनही प्रेयसीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसरीकडे लावले. दरम्यान, झाकरीनच्या खोलीत शिरल्यानंतर राहुलने झाकरिनच्या छातीवर आणि हातावर चाकूने वार केले.

यामध्ये ती जखमी झाली. झाकरीनच्या आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य तिच्या खोलीत आले. मुलीला रक्ताने माखलेले पाहून सर्वजण संतापले. आणि त्यांनी राहुल उर्फ मुर्शीदला बेदम मारहाण केली. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. जिथे झाकरिनचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने राहुलचाही मृत्यू झाला.

झाकरिनची आई हाजरा म्हणाली की, तिची मुलगी रविवारीच तिच्या सासरच्या घरून माहेरी आली होती. राहुल आणि झाकरिन दोघांच्याही घरांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस तपास करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेने सगळेच हादरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!