‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई, आकडा थक्क करणारा..

मुंबई : अभिनेता विकी कौशल स्टारर ऐतिहासिक ‘छावा’ सिनेमा २०२५ वर्षातील बहुप्रतीक्षीत सिनेमा आहे. १४ फेब्रुवारी रोजी सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांना तुफान गर्दी केली. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगने देखील सर्व रेकॉर्ड मोडले. सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने ३१ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे ‘छावा’ २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांच्या ओपनिंग डे कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले. सध्या सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे, आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.
‘छावा’ सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहेत. त्याने या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, ज्याचे परिणाम सिनेमाच्या यशावर दिसून येत आहेत.

या सिनेमात रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, आणि डायना पेंटी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाचा बजेट १३० कोटी रुपये आहे.
सिनेमाची कमाई केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांमध्येही प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या इतर सिनेमांपेक्षा ‘छावा’ ने अधिक कमाई केली आहे. ‘विदामुयार्ची’ आणि ‘स्काय फोर्स’ या सिनेमांनी अनुक्रमे 26 कोटी आणि 15.30 कोटी रुपयांची कमाई केली होती, पण ‘छावा’ने त्यांना मागे टाकले.