पुण्यातील वाढत्या वाहतुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला PMPML बाबत मोठा निर्णय, पुणेकरांना दिलासा…


पुणे : मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ५०० बसेस खरेदी करणार आहे. तसेच, उर्वरित ५०० बसेस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका खरेदी करणार आहेत. यामुळे पुणेकरांना जास्तीच्या गाड्या उपलब्ध होणार आहेत. यामुळे दिलासा मिळाला आहे.

यामुळे आता पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस ताफ्यामध्ये वाढ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने एक हजार बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

पीएमआरडीए’ (PMRDA) ने बस खरेदीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी ५०० बसेस खरेदी कराव्यात, असे आदेश दिले. यामुळे या कामाला वेग आला. पुण्यात अनेक ठिकाणी गाड्या अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांना अडचण निर्माण होत आहे.

पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बसेसची खरेदी आवश्यक आहे. दोन्ही शहरांतील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, सहा हजार बसेसची गरज आहे, परंतु सध्या १६५० बसेस रस्त्यावर धावत आहेत. लवकरच, ३०० बस त्यांचे आयुर्मान संपल्यामुळे कमी होणार आहेत. यामुळे नवीन बसेसची गरज आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेला बस खरेदीसाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, त्यासाठीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात येणाऱ्या काळात वाहतुकीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!