पिझ्झा मागवला म्हणून विद्यार्थिनींना हॉस्टेल बाहेर काढलं!! पुण्यातील घटनेने संताप, नेमकं घडलं काय?


पुणे : पिझ्झा खाण्याचा मोह झाल्याने हॉस्टेलमध्ये पिझ्झा मागवला म्हणून विद्यार्थीनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याची घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह आहे.

याच ठिकाणी असलेल्या काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता. मात्र, वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी यावर आक्षेप नोंदवला अन् कारवाई केल्याचं प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मुलींनी पिझ्झा मागवल्याचं वसतिगृहाच्या गृहप्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळालं आणि त्यांनी एक अजब फतवा जारी करत केला. एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनी पैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला? हे स्पष्ट होत नसल्याचं कारण देत चौघींनाही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घातल्याची घटना समोर आली आहे. मिनाक्षी नारहारे यांनी काढलेल्या या अजब फतव्याने समाज कल्याण विभाग देखील हादरले आहे.

हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील व्यक्ती किंवा खाद्य पदार्थ आणण्यास नियमानुसर बंदी आहे. मात्र, हा नियम मुलींनी मोडला आणि पिझ्झा मागवला होता, त्यामुळे कारवाई केली जात असल्याचं विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले मात्र, अशा चुकांसाठी विद्यार्थिनी प्रवेश बंदी करण्याचे आदेश समजिक न्याय विभागाने परित केले आहेत का? याचा खुलासा होत नसल्यानं पालकांमध्ये संताप आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!