मोठी बातमी! दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप, अरविंद केजरीवाल आणि सिसोदियांचा पराभव….


नवी दिल्ली : दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी मार्लेना पिछाडीवर पडले आहेत. जंगपूरा मतदारसंघातून दिग्गज नेते मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. दरम्यान सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 48 जागांवर भाजप पुढे आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे. आम आदमी पक्षाला 23 आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळताना दिसत आहे. कल भाजपच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पक्षाचे तीन बडे नेते पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर पडले आहेत.

यामुळे अजून काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आरोपांमुळे दिल्लीकरांचा अरविंद केजरीवाल आणि आप वरील विश्वास डळमळीत होतो का, हे आज जाहीर होणाऱ्या निकालांमधून स्पष्ट होईल. काँग्रेसला मोठा धक्का या निवडणुकीत बसणार असल्याचे अनेक सर्व्हेमधून दिसून आले आहे. मुख्य लढत ही आप आणि भाजपमध्ये आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!