दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का!! भाजपची मोठी आघाडी, केजरीवालही पिछाडीवर…


नवी दिल्ली : दिल्लीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. दरम्यान सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा मतमोजणीच्या पोस्टल मतांची मोजणी सुरु आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप ३४ जागांवर आघाडीवर आहे.

आम आदमी पक्षाला १६ आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळताना दिसत आहे. कल भाजपच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पक्षाचे तीन बडे नेते पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर पडले आहेत. यामध्ये आतिशी, मनिष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. यामध्ये भाजप पक्ष ३४ जागांवर, तर आप १६ जागांवर आघाडीवर आहे.

यामुळे अजून काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आरोपांमुळे दिल्लीकरांचा अरविंद केजरीवाल आणि आप वरील विश्वास डळमळीत होतो का, हे आज जाहीर होणाऱ्या निकालांमधून स्पष्ट होईल. काँग्रेसला मोठा धक्का या निवडणुकीत बसणार असल्याचे अनेक सर्व्हेमधून दिसून आले आहे. मुख्य लढत ही आप आणि भाजपमध्ये आहे.

सध्या भाजपने परिस्थिती बदलली आहे. 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली म्हणजे ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!