काय सांगता! शाळाच गायब झाली, तपासणीसाठी गेलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना अजब अनुभव, धक्कादायक माहिती आली समोर…


पुणे : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सध्या प्रत्यक्ष शाळा भेटी देण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे होता. नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी आठवड्यातील काही दिवस शाळांना भेटी देण्याच्या सूचना केल्या आहेत. खेड तालुक्यातील शाळांच्या भेटीदरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती अशी की, मरकळ येथे शाळा भेटीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तेथील पत्त्यावर शाळाच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नंतर शाळा इतर ठिकाणी भरत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

शाळेला भेट दिल्यानंतर वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक, तसेच अनेक गैरप्रकार उघडकीस आले. शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांना या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याठिकाणी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गाला मान्यता नसताना वर्ग भरवले जात आहेत. त्याबाबत एका समितीची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे याबाबत तपास केला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

पालकांनी शाळेत प्रवेश घेताना मुलांची सुरक्षितता, शाळा मान्यता आणि शाळा मूळ जागेवर भरते का? याची खात्री करून प्रवेश घ्यावा, असे नाईकडे यांनी सांगितले. तसेच याठिकाणी शिक्षक असले तरी शिक्षण कशा प्रकारे मिळत आहे, याबाबत खात्री करावी.

याठिकाणी धक्कादायक प्रकार म्हणजे १३ विद्यार्थी क्षमता असलेल्या वाहनात २४ ते २५ विद्यार्थी दाटीवाटीने बसलेले आढळले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे याठिकाणी लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी मोकळा परिसर देखील नाही, असेही दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!