राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! राज्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आजच निर्णय?

मुंबई : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यामुळे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काही वर्षांपासून अनेक मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. यामुळे इच्छुकांनी तयारीही करून ठेवली आहे.

मागे आलेला कोरोना संकट काळ आणि ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेली याचिका यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत निर्णय होणार आहे. सहकारी संस्था देखील लांबणीवर गेल्या आहेत.
निवडणुकांबाबत कोर्टात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आज नेमकं काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यानंतर पुढच्या महिन्यातच निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे.

यामुळे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत, कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. यामुळे राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे. कोर्टाने निवडणुकांचा प्रश्न मार्गी लावला तर लागोलाग निवडणुका होणार आहेत.
दरम्यान, सध्या अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा राजकीय युद्ध बघायला मिळेल.