मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गांवर उर्से टोलनाक्याजवळ अपघात ; तिघे जागीच ठार…!


पुणे : मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोल नाक्याजवळ कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. आज (ता. १७) सकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास हा अतिशय भीषण अपघात झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कारने ट्रकला मागून जोरात धडकली. यामध्ये जवळपास अर्धी कार ट्रकच्या मागील बाजुने ट्रकखाली गेली. चालकासह तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने वाहने बाजुला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.

 

या अपघातात अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!