धक्कादायक! शिरूरमध्ये वडील शेतात काम करताना लेकीचा ओरडण्याचा आवाज, मुलीजवळ गेले तोपर्यंत सगळंच संपलं..

शिरूर : शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गणेगाव दुमाला परिसरात पिकअप जवळ खेळत असताना गाडीचे चाक अंगावरून गेल्याने एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेहा दीपक पवार असे या चिमुकलीचं नाव आहे. तसेच सुनील दत्तात्रेय खळदकर असं पिकअप चालकाचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास केला जात आहे. या घटनेने सगळेच सुन्न झाले आहेत. दीपक पवार हे दौंड नानगांव येथील एका गुरहाळावर कामासाठी कुटूंबासोबत राहत होते. ते ऊसतोडीचे काम करतात.
घटनेदिवशी ते पिकअपमध्ये बसून ऊस तोडण्यासाठी गणेगाव दुमाला येथे आले होते. पिकअप चालकाने गाडी शेतात असणाऱ्या कच्या रस्त्याला लावली होती. तसेच त्याने गाडीला चावी तशीच ठेवून तो घरी निघून गेला. नेहा त्यावेळी पिकअप जवळ खेळत होती. काही वेळात तिचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला.

नंतर वडील दीपक यांनी पाहिले असता तिच्या अंगावरून पिकअप गाडीचे चाक गेल्याचे दिसून आले. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या नेहाला दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपास सुरू आहे.
ही घटना घडल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. नेमकं चाक अंगावरून कसे गेले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी पोलिसांनी भेट दिली असून तपास करत आहेत.