रस्ता ओलांडायला गेले अन् घडलं भयंकर!! शेवाळवाडीत दोघांना भरधाव बसची धडक, पतीचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक…

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील पुणे – सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी भाजी मार्केटसमोरून रस्ता ओलांडणाऱ्या एका पती पत्नीला भरधाव बसने धडक दिली. या धडकेत पतीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

येथील शेवाळवाडी भाजी मार्केटजवळ सायंकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी बसचालकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच वाहतूक कोंडी झाली होती. जयंत भामरे ( रा. ग्रीनवुड्स, शेवाळेवाडी, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तसेच या अपघातात त्यांची पत्नी वैशाली भामरे गंभीर असे जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी संजय उज्जैनराव दिंडे (रा. चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी प्रियांका भामरे (वय -28) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी सात वाजायच्या सुमारास शेवाळेवाडी भाजी मंडईजवळ दोघे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव बसने धडक दिल्याने दांपत्य गंभीर जखमी झाले. या अपघातात जयंत भामरे यांचा मृत्यू झाला तर पत्नी वैशाली भामरे या गंभीर जखमी झाल्या.
हा अपघात झाल्यानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक गांधले करीत आहेत. जयंत भामरे व त्यांची पत्नी हे दोघे शेवाळेवाडी येथील ग्रीनवुड्स सोसायटीत राहतात. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.