उरुळीकांचन येथील डॉ. अस्मिता कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व! आंध्रात न्यूज पेपर वाल्यांनी घेतली लोककलेची दखल..


उरुळी कांचन : आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे दि. १० ते १२ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय युवा सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता प्रायमरी, सेकंडरी प्रायमरी अँड हायर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकधारेचे सादरीकरण करून उत्कृष्ट संघाचे पारितोषिक व सन्मानपत्र पटकावले आ. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आंध्रप्रदेशातील कुन्नूर जिल्ह्यातील वृत्तपत्राने महाराष्ट्राच्या लोककलेचे
कौतुक केले आहे.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आंध्रप्रदेशात दिवंगत नेते डॉ. एस. एन. सुब्बाराव आणि सतपाल जी यांच्या स्मरणार्थ ‘दक्षिण आशियाई देश आणि देशांतर्गत राज्य, केंद्रशासित प्रदेशातील महाविद्यालयीन संघांचा सामावेश असलेला ‘राष्ट्रीय युवा महोत्सव’ आयोजित केला होता. या महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी डॉ. अस्मिता प्रायमरी, सेकंड प्रायमरी, हायर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता ११वीच्या ८ मुली व ८ मुले अशा एकूण १६ जणांना केली आहे.

या विद्यार्थ्यांत राज नराळे, प्रथमेश ननावरे, साहिल गायकवाड, प्रेम चाबुकस्वार, ओम ढमाळ, कुणाल इटकर, आदित्य जगताप, ओम डोके, आरती ढमाळ, वैष्णवी तरंगे, पल्लवी राठोड, चैत्राली गुंड, दिव्या बडेकर, वैष्णवी खराडे, रविता वर्मा, समृद्धी दरेकर यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी आषाढी वारी, गोंधळ-जागर, कोळीगीत, लोकगीत अशा नृत्यप्रकारांचे सादरीकरण करून उत्कृष्ट संघाचे पारितोषिक पटकावले आहे.

या सर्वांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सागर रोकडे, प्रा. जगदीश दुलानी, प्रा. जयश्री भोस-नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळून या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक मिळाल्याने मोठा जल्लोष केला आहे.

या कामगिरीची दखल आंध्र प्रदेशमधील स्थानिक वृत्तपत्राने देखील घेतली आहे. अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य जगताप, विभागप्रमुख परभाणे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!