महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीत बदल घडवणारं राजकारण करायचंय, बदला घेयच राजकारण करायचं नाही!! फडणवीसांचे मोठं वक्तव्य


नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच भाषणात महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीत बदल घडवणारं राजकारण करायचं आहे. दक्षिणेत दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बालू शकत नाही. ती परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती.

महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. इथं बदला घेण्याचे राजकारण करायचे नाही. 2019 से 2024 सालात वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी भिंत तोडली, ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. येणाऱ्या काळात अनेक बदल करायचे आहेत.

माझा स्वत:चा समज असा आहे की, फडणवीस कुटुंबात राजकारणातला शेवटचा मी आहे, असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी आहे. तसेच मुलीबाबत ते म्हणाले, मी गमतीने नेहमी म्हणतो की आमच्या घरात सगळ्यात प्रगल्भ दिविजा आहे. तिचं वय 15 वर्ष आहे. पण तिच्याकडे कमी वयात खूप प्रगल्भता आहे.

तिला पत्रकारांनी विचारलं की, फडणवीस मुख्यमंत्री होणार का? त्यावर तिने सांगितले की जो मुख्यमंत्री होईल तो महायुतीचा होईल. नेते ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल, अस उत्तर तिने दिल्याने तिचं कौतुक करावं वाटतं. यामुळे तिला माहित आहे की राजकारणात टार्गेट केले जाते.

आम्ही तिला न शिकवता तिनं आत्मसात केलं. तिला राजकारणात यायचं असेल तर तिने जरूर यावं. पण मला नाही वाटत तस काही होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच भाषणात महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीत बदल घडवणारं राजकारण करायचं आहे.

बदला घेण्याचं राजकारण करायचं नाही. असं म्हणालो होतो. लोकांनी भिंत तोडली, ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एकुलत्या एक लेकीचे कौतुक देखील केले आहे. आता येणाऱ्या काळात फडणवीसांच्या राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!