Crime News : सोलापूर हादरलं!! शेतीच्या वादातून दोघांचा खून, पुतण्यानेच चुलत्याचा काढला काटा..

Crime News : दिवसागणिक राज्यातील गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक हादरवून टाकणारी घटणा सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेत दोन जणांची हत्या केल्याची घटना घडली आहे. शेतीच्या वादातून ही हत्या झाली आहे.
पुतण्याचा त्याच्या चुलत्यासोबत शेतावर बांध बांधण्याच्या मुद्यावरून वाद सूरू होता. या वादातून पुतण्याने चुलत्याच्या कुटुंबियांवर चाकुने हल्ला केला होता. या हल्यात चुलतीचा आणि चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. तर या हल्यानंतर चुलत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सूरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सूरू केला आहे. Crime News

मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ही घटना घडली आहे. किसन पाटील आणि सौदागर पाटील हे काका पुतणे आहेत. या काका पुतण्यांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सूरू होता.

हा वाद २४ डिसेंबरला फारच टोकाला गेला होता. त्यांचे झाले असं की चुलता किसन पाटील त्याची बायको आणि मुलासह बांधावरून बैलगाडीने येत होती. ही बैलगाडी पुतणा सौदागर पाटील याला कळताच तो दोन महिलांसह घटनास्थळी पोहोचला.
यावेळी पुतण्याने चुलता किसन पाटील, सागर पाटील आणि सिंधू पाटील यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. यानंतर आरोपीने पोटात चाकू खुपसून चुलती सिंधु पाटील आणि चुलत भाऊ सागर पाटील यांचा खून केला.