पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर अशी बातमी आली अन् आईने…!! अजित पवारांनी बारामतीत सांगितला ‘तो’ किस्सा


बारामती : उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवारांचा नागरी सत्कार बारामतीत संपन्न झाला. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत एक किस्सा देखील सांगितला. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी त्यांच्या आईची एक आठवण सांगितली.

मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरु असताना सुरुवातीच्या कलांमध्ये अजित पवार बारामतीत पिछाडीवर अशा बातम्या आल्या. या बातम्या आल्यानंतर अजित पवारांच्या घरी नेमकं काय घडलं, ते त्यांनीच जाहीर सत्कार सोहळ्यात सांगितले आहे. यामुळे उपस्थितांनी देखील दाद देऊन टाळ्या वाजवल्या.

अजित पवार म्हणाले, पोस्टल मतदानामध्ये मी पिछाडीवर अशा बातम्या लागल्यावर आमच्या मातोश्री देवघरात जाऊन बसली. त्यावेळी माझी मोठी बहीण आईजवळ होती. तिला आई म्हणाली, रजू अक्का असं कसं झालं. तेव्हा ती म्हटली की हे असं नाही. आम्ही बारामतीत फिरलो आहे. काळजी करू नको. पुढे बघ काय होतंय.

तेव्हा ती पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा, अशी देवाची नावे घेत होती. त्यानंतर मी एकाला फोन केला. त्याने सांगितले, आपल्याला ६० ते ७० टक्के मतं मिळत आहेत. आपण आत्ता पुढे आहोत. बारामतीकरांचं, असं मत होतं की, आपल्याला लाखांच्या पुढे मताधिक्य घेयचे आहे. आणि तसच झालं.

यावेळी अजित पवार म्हणाले, आजवरच्या सर्वात जास्त माझ्या राजकीय कारकिर्दीतील विकास या पंचवार्षिकमध्ये करणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांपुढे व्हिजन मांडले. त्यामुळे विधानसभेला महायुती न भूतो न भविष्यती यश मिळाले. त्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!