‘मी पवार कुटूंबाच्या जवळचा’ असं सांगून लाखोंची फसवणूक, इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या व्यक्तीचा कारणामा, वास्तव समजताच सगळेच हादरले…


इंदापूर : तालुक्यातील भवानीनगरमध्ये एक फसवणूकीची घटना घडली आहे. या भामट्याने लोकांकडून फसवणूक करून पैसे घेऊन जलसंपदा विभागाची बनावट नियुक्तीपत्रे फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती समजताच सगळेच हादरले आहेत.

या व्यक्तीने आपण अजित पवार, सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबातील असून आपण दररोज त्यांच्याबरोबरच असतो, असे सांगत सातारा आणि पुण्यातील काही कुटुंबांची फसवणूक केली आहे. डी. बी. पवार असे याचे नाव आहे. तो भवानीनगर नजीकच्या भाग्यनगर परिसरातील रहिवासी आहे.

त्याने पुण्यातील व सातारा जिल्ह्यातील अनेकांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेतची छायाचित्रे दाखवून आपण त्यांचेच काम करतो, असे सांगत विश्वास संपादन केला व त्यांच्याकडून पैसे घेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवले. यामुळे अनेकांनी त्याला पैसे देखील दिले. यामुळे मोठी फसवणूक झाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित तक्रारदारांनी संपर्क साधला असता, हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारदारांनी या भामट्याचे काही चॅटिंग देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दाखवले आहे. यामुळे हा सगळा प्रकार पुढे आला आहे. याबाबत आता तपास सुरू आहे.

यामध्ये ही फसवणूक जवळपास 60 ते 70 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंधित एक व्हिजिटिंग कार्ड देखील काढले होते. इंदापूर तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून आपण काम करतोय असेही त्याने सांगितले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!