Accident News : पुण्यात भीषण अपघात! मद्यधुंद डंपर चालकाने ९ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू…


Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. अध्या अशीच एक अपघाताची घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या ९ जणांना पुण्यात वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडलं.

पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ९ जणांना चिरडले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. Accident News

वैभवी रितेश पवार (वय.१), वैभव रितेश पवार (वय.२), रीनेश नितेश पवार (वय.३०) अशी मृतांची नावे आहेत. तर यात जानकी दिनेश पवार (वय. २१), रिनिशा विनोद पवार (वय.१८), रोशन शशादू भोसले (वय 9), नगेश निवृत्ती पवार (वय.२७), दर्शन संजय वैराळ (वय.१८), आलिशा विनोद पवार (वय.४७) जखमी झाले आहेत.

गजानन शंकर तोट्रे (वय २६ रा. नांदेड असे डंपर चालकाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, वाघोलीतील केसनंद फाट्यावर रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळे त्याने भरधाव डंपर फूटपाथवर चढून झोपलेल्या लोकांच्या अंगावर घातली. हे सर्व कामगार वर्ग आहे.

या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. डंपर चालक गजानन तोट्रे क्रमांक (MH 12 VF 0437) याने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे.

आरोपी डंपर चालक गजानन तोट्रे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!